Posts

शकुंतला shakuntala

Image
शकुंतला शकुंतला ही कादंबरी महाकवी कालिदास यांच्या 'शाकुंतल' या नाटकाचा भावानुवाद आहे. शाकुंतल ही संस्कृत मधील सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. महाकवीच्या आशयातून आनंद साधले यांनी त्यांच्या भाषेत ती प्रस्तुत केली आहे. मूळ संस्कृत भाषेतील या पुस्तकाचे त्यांनी शब्दशः भाषांतर केलेले नाही. तिला कादंबरीच्या कथानकात ढाळण्यासाठी त्यांनी मूळ आशयाचे सौंदर्य तसेच ठेऊन अगदी सुरेख शब्दसंगती केली आहे. तसे शाकुंतल हे नाटक सर्वपरिचित आहे. पण तरीही पुस्तक वाचताना आपण अजूनच रसिक होऊन जातो. यातील स्थळांचे निसर्ग सौंदर्य आणि एकेक पात्र वाचताना आपण त्या रसगंधी उद्यानात स्वतः असल्याचा भास होतो. शकुंतलेचे रम्य व्यक्तिमत्व आपल्याला तिथेच गुंतवून ठेवते. शकुंतला ही विश्वामित्र आणि मेनकेची कन्या. पण ती वाढली हिमालयाच्या उतारावरील पुण्यभूमीत, मालिनी नदीच्या तीरावरील कण्व महर्षींच्या आश्रमात, त्यांची कन्या म्हणून. तिथे त्या वेळचा हस्तिनापुरचा सम्राट राजा दृष्यंत शिकार करता करता महर्षींच्या तपोभूमीत प्रवेश करतो. कुलपतींच्या गैरहजेरीत त्यांची कर्तव्य सांभाळणारी त्यांची कन्या शकुंतला हिच्याशी त्याची भेट होते.

मराठी कविता || पाऊस || पायी रिंगणाचे जोडे || नित || नितेश पाटील || mara...

Image

चिखल घाम आणि अश्रु बेअर ग्रिल्स chikhal gham aani ashru bear grils

Image
# चिखल_घाम_आणि_अश्रू ब्रिटिश गिर्यारोहक बेअर ग्रील्स याचं हे आत्मकथन. त्याची टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहण्यात आलेली मालिका असेल, ती मला वाटतं "मॅन वर्सेस वाईल्ड". काही जणांचं म्हणणं आहे की त्याच्या दिमतीला एक प्रशिक्षित टीम असते. कॅमेरा टीम असते. असेलही... पण म्हणून त्याचे तिथवर पोहोचेपर्यंत केलेले धाडस, जिद्द, चिकाटी कमी आखता येणार नाही. या प्रकाशझोतात येण्यापूर्वीची त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. बेअर ग्रील्स हे धाडसाचं नाव आहे. जिद्द ही त्याच्या नसानसात भिनलेली आहे. त्याच्या मते आयुष्यात बहुतेकदा धाडस हे नकळत सुरू होतं. आणि कदाचित तिथूनच आयुष्याला खरी सुरवात होते. वयक्तिक प्रगतीसाठी अतोनात कष्ट आणि पाठपुरावा करणं हीच त्याच्यासाठी यशाची खरी गुरुकिल्ली होती. युके स्पेशल फोर्स चा तो माजी सैनिक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली जगातील अवघड, कठीण आणि अशक्यप्राय अश्या मोहिमांचे विक्रम मोडले गेलेत. त्या मोहिमांचे नेतृत्व करून 1.5 दशलक्ष पौंडापेक्षा जास्त रक्कम त्याने "बाल कल्याण निधी"ला मिळवून दिलेली आहे. तसेच 2009 मध्ये "सर्वात तरुण स्काऊट प्रमुख" म्हणून

मृत्युंजय Mrutyunjay

Image
# मृत्युंजय ही कादंबरी आहे मृत्यूच्या भीतीवर जय मिळवणाऱ्या पण अखंडित संभ्रमित असणाऱ्या कर्णाची. सर्वपरिचित अशी कादंबरी... तब्बल ३७ ग्रंथातील संदर्भ घेऊन, त्याचं चिंतन, मनन करून शिवाजी सावंत यांनी अलंकारिक भाषेत ही कादंबरी लिहली. आणि या कादंबरीने साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडले. कादंबरीची सुरवातच अशी आहे की "आज मला काही बोलायचं आहे." कालवश माणसं केव्हा बोलतात तर, जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागत. या वाक्यातच किती जिवंतपणा आहे. मनाच्या सखोल, गहनगंभीर गाभाऱ्यातून कर्णाला एक आवाज स्पष्ट ऐकू येतो. आणि त्यानुसार आयुष्याच्या भात्यातील विविध घटनांचे बाण मोकळ्या मनाने त्याला सर्वांना दाखवायचे, आपली जीवनकथा सर्वांना सांगावी असे म्हणून सुरवात होते. महाराज शत्रुघ्नच्या पुण्यवान नगरात, मथुरेत आपलं बालपण जगेलेली पृथु. पुढे तिचे वडील मथुरेचे यादवराज शुरसेन यांनी त्याचा भोजपुर नगरातील आतेभाऊ कुंतीभोज याला दिलेला शब्द पाळून तिला त्याच्या स्वाधीन करतात. आणि ती भोजपुर नगरात राहू लागते. त्यांच्या नावावरून तिला ते कुंती

युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant

Image
# युगंधर स अधिक हित म्हणजे साहित्य. वाचकाचं कणभर तरी हित साधतं ते साहित्य..! शिवाजीराव सावंत यांनी मृत्युंजय (कर्ण), छावा(छत्रपती शंभूराजे) तदनंतर  # युगंधर  योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर त्यांनी ही कादंबरी सिद्ध केली. तब्बल इंग्रजीतील ३३ आणि मराठीतील ८२ संदर्भ ग्रंथांच्या अभ्यासातून. या कादंबरीत श्रीकृष्णाच्या प्रेमयोगावर आधारित बरसच भाष्य आहे. युगंधर या कादंबरीत बोलणाऱ्या व्यक्तिरेखा सात आहेत. सात भागत ही कादंबरी विभागली आहे. त्यात अनुक्रमे स्वतः श्रीकृष्ण, कृष्णपत्नी रुक्मिणी, कृष्ण सारथी दारूक, पांडवपत्नी द्रौपदी, धनुर्धर अर्जुन, यादव सेनापती सात्यकी आणि कृष्ण परमसखा चुलतबंधु उद्धव असे भाग आहेत. महाभारत भारतवर्षात जुन्यात जुना उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज आहे. महाभारत ही भाकडकथा नाही. आणि गीता ही महाभारताच्या कथासागरातील अशी मौल्यवान घागर आहे जीच्यातील थेंबाथेंबात मानवी जीवनाचा सागर शब्दशः घुसळून काढण्याचं सामर्थ्य आहे. त्या महाभारताचा कणा, नायक श्रीकृष्ण आहे. युगंधर कादंबरीची सुरवात देखील मृत्युंजय प्रमाणे, मलाही आज बोललंच पाहिजे !! या वाक्यातून होते. फरक एवढाच क

हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात Himalayatil mahatmyanchya sahavasat स्वामी राम

Image
# हिमालयातील_महात्म्यांच्या_सहवासात “Living with the Himalayan Masters” by Swami Rama या पुस्तकाचा, “स्वर्णलता भिशीकर” यांनी मराठीतून केलेला अनुवाद म्हणजे “हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात” हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजेच प्रगाढ शांती असलेल्या रौद्रसुंदर हिमालयाच्या जिवंत शिखरांच्या वस्तीत, महात्म्यांच्या सहवासातील 'स्वामी राम' यांचा आध्यात्मिक प्रवास. त्या प्रवासात त्यांनी त्यांच्या गुरु आज्ञेने हिमालयातील अनेक साधूसंतांसमवेत राहून, त्यांना आलेल्या अनुभवाना यात शब्दरूप दिले आहे. स्वामी राम यांचे वडील मोठे संस्कृत पंडित आणि अध्यात्म साधक होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांच्या गुरूंनी त्यांना संगितले की तुम्हाला मुलगा होईल तो मला द्यायचा आहे. बरोबर त्यानंतर अठरा महिन्यांनी त्यांना मुलगा झाला. ते स्वामी राम. तीन वर्षानी त्यांच्या गुरूंनी उजव्या कानात मंत्र सांगून स्वामी राम यांना अनुग्रह दिला. काही वर्षानी त्यांच्या मातापित्यांनी देह ठेवल्यावर ते गुरूंकडे निघून गेले आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यात त्यांनी करविरपिठाचे शंकराचार्य (1949 ते 1951) हे पदही भूषविले ह

महाप्रस्थान भास्कर जाधव Mahaprasthan

Image
#महाप्रस्थान #युगंधर ही कादंबरी वाचून झाली होती. आणि भास्कर जाधव यांनी लिहलेल्या महाप्रस्थान या कादंबरी विषयी कळलं... काही दिवसांपूर्वी ती कादंबरी हातात पडली आणि वाचायला सुरुवात केली...तब्बल ६४० पानांची ही कादंबरी... पण यात संदर्भांचा उल्लेख नाही... भास्कर जाधवांची लेखनशैली आपल्याला खिळवून ठेवते. एक दोन विषय असे की थोडे मन बाजूला जाण्यास वाव आहे. पण एकंदरीत बाकी वाचनीय आहे कादंबरी. कादंबरीबद्दल त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर... महाभारतीय युद्धाच्या पहिल्या दिवसापासून, पांडवांच्या महाप्रस्थानापर्यंतचा कालखंड या कादंबरीत शब्दबद्ध केला आहे... या कालखंडातील धग, दाह, वेदना, संवेदना, दुःख, श्वास, निश्वास, उसासे-हुंदके, अश्रूपात तसेच शोध-प्रतिशोध, संघर्ष व अट्टाहास, यश-अपयश हे मानवी भावभावनांच प्रतिनिधित्व करणारं सारं त्यात आहे. जे उत्तम शब्दात उभं केलंय. महाप्रस्थान या कादंबरीत बोलणाऱ्या व्यक्तिरेखा चारच आहेत. त्यात अनुक्रमे दिव्यदृष्टी लाभलेला संजय, दासीपुत्र विदुर, भगवान श्रीकृष्ण, आणि समय म्हणजेच काळ... #संजय महाभारतीय युद्धात सुरवातीपासून अंतापर्यंत, महर्षी व्यासांनी दि