Posts

Showing posts from September, 2018

उपरा.... लक्ष्मण माने upara

Image
ऊपरा वाचताना मन भरुन येतं... प्रेमात सगळं  माफ असतं म्हणे... आणि त्या आशयाचं भरपुर लेखन आणि कविताही वाचल्या पण हे पुस्तक वाचताना ते सारं काही बकवास वाटत जातं.आपण ज्या समाजात जगतो त्या समाजात नक्की माणसचं राहतात का ह्याची शंका वाटते पण जसं मृगजळाच ं रुपांतर पाण्यात व्हावं आणि तात्पुरता का होईना तहान भागावी तसा त्यांच्या आयुष्यात एक संत माणुस येतो डाॅ.नरेंद्र दाभोळकर........ आणि मग वाचता वाचता मनात एक प्रश्न निर्माण होतो.का मारलं असेल त्याना...?  का माणुस हा माणुस राहीला नाही..?

बलुतं (दया पवार) baluta

Image
बलुतं - दया पवार पु लं नी बलुतं बद्दल लिहिताना नमूद केलं आहे कि, इतकं जीवनाचा कारुण दर्शन घडल्यावर वाचक आपसूकच माणूस म्हणून स्वतःत योग्य ते बदल माणूसकीपायी करून घेईल. एखाद्या साहित्याचा ह्याहून हि अधिक यश आणि गौरव तो काय असेल?  आज दगडू केवळ पुस्तकरूपी हयात असला तरी एक विचार राहतोच मनात, दगडूच्या आयुष्यातल्या सोनेरी दिवसांची झालेली हेळसांड, गेलेला काळ कधी भरून देऊ शकतो का? शिळेखाली हात होता, तरी नाहीं फोडला हंबरडा किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा

बारी (रणजित देसाई) bari ranjit desai

Image
# बारी  - रणजित देसाई साधे सरळ आयुष्य किती नेटानं जगलो मी नवी आली क्रांती अन किती फरफटलो मी बारी ही रणजित देसाई यांची पहिली कादंबरी. वी.स. खांडेकरांनी तिचं प्रास्ताविक लिहिलंय. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर... लेखक व त्याच्याशी अपरिचित असलेला वाचक यांच्यात जो अन्तरपाट असतो तो मंगलाष्टके म्हणून दूर करण्याकरिता प्रस्तावनकाराची आवश्यकता असते. आणि ते अगदी सूचक पद्धतीने प्रस्तावनेत मांडले आहे. कादंबरी बद्दल म्हणायचं झालं तर... एक बेरड समाजातील तेग्या या कादंबरीचा नायक आहे. यंत्रयुगाकडे वाटचाल करतांना, त्याच्या समाजातील, जीवनातील होणाऱ्या बदलाची आणि त्या बदलामुळे शेवटी सर्वस्व हिरावून गाव तरुणमुक्त होते आणि गावात सरतेशेवटी म्हातारेच कुढत राहतात असा केविलवाणी प्रवास, बेरड जमातीचे परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि या जमातीच्या भवितव्याची काळजी या कादंबरीत आहे. आयुष्य संपणार कधीतरी, मी जाणूनच आहे तूर्त ओझे आठवणींचे फार मज छळते आहे रानात पलोत्याच्या उजेडात दिसलेली नागी, त्याच्या मनाला भुरळ घालते. लग्नास तयार नसतानाही, तिच्या बाप संमतीने पळवून आणतो आणि लग्न करत

महातीर्थाचा अखेरचा यात्रिक mahatirthacha akheracha yantantrik

Image
#महातीर्थाचा_अखेरचा_यांत्र िक काही पुस्तकं अक्षरशः आपल्याशी बोलतात, आणि आपलं मन त्यांच्या भूतकाळातील वास्तविक दुनियेत रमू लागतं. मग आपसूकच नवे संकल्प मनात फेर धरू लागतात. ते पूर्णत्वास नेण्यास मन धावू लागते. मन सागरात लाटा  त्यांच्या अगणित वाटा किनाऱ्यास धडक ठरलेली देहाच्या झिजती टाचा आयुष्यात प्रवास कुणालाच चुकत नाही. जीवन क्षणभंगुर असलं, तरी मरेपर्यंत सर्वानाच प्रवास करावा लागतो. आणि प्रवास म्हंटला की त्याची सुरवात अगदी छोट्या पाऊलापासून सुरू होते. त्या अनुभवातून माणूस समृद्ध होऊ लागतो. त्याला एक नवी दिशा मिळते आणि त्याची दशा बदलत जाते. माणूस नवनवीन प्रवास करून माघारी फिरतो, तेव्हा तो पूर्वीसारखा निश्चितच राहत नाही. म्हणूनच मला, नव्हे प्रत्येकालाच प्रवासाची ओढ असते. पण माझा प्रवास आणि माझा आवाका तो किती ? प्रश्नचिन्ह आहे. आपल्यासमोर अनेक जीवनप्रवासाचे आदर्श प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे पुस्तकरुपात आहेत. त्यातीलच एक पुस्तक "महातीर्थाचा अखेरचा यांत्रिक". या पुस्तकाबद्दलच म्हणायचं झालं तर... कैलास मानसरोवरबद्दल अत्युच्च कोटींची श्रद्धा, भक्ती पुराणकाळापासून कित्येकांच्या

हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu

Image
# हिंदू   # जगण्याची_समृद्ध_अडगळ २०१४ या वर्षी ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित झालेलं हे मराठीतील चौथं साहित्य. तत्पूर्वी १९७४साली ययाती (वि. स. खांडेकर), १९८७ साली विशाखा कवितासंग्रह (कुसुमाग्रज), २०१३ साली अष्टदर्शने(वि.द. करंदीकर) हे साहित्य या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. ____हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (अडगळ हा शब्द खटकला पण...) कशी असू शकते हे या कादंबरीत उलगडत जाते. खंडेराव स्वतःशीच संवाद साधून झोपी जातो. स्वतःशीच बोलू लागतो. आणि त्याला पुन्हा दिसू लागतात, त्यांनी संशोधित केलेल्या खाणाखुणा. व्यासपीठावर पुरातत्वज्ञ मिस्टर म्हणून अध्यक्ष त्यांची ओळख करून देतात. आणि त्यांचा शोधनिबंधाची माहिती उपस्थितांना करून देण्यास सांगतात. तदनंतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच विश्लेषण त्यांनी केले आहे. खान्देशातील मोरगाव हे खंडेरावांचे गाव. त्यात त्यांचा लाहोर ते खान्देशातील मोरगावाचा प्रवास, पाकिस्तान ते भारत, आठवणींच्या वर्तमानात होणारे सारे बदल त्याचा जीवनावर होणारे परिणाम, समाजातील खाणाखुणा, जाती जमाती, शोषण, ऐतिहासिक, लोककथा यांचा जीवनावर होणारा परीणाम, साऱ्यांचा गुंता कसा प्रबळ होत ज

हसरे_दुःख (भा. द. खेर) charlie chaplin hasare dukha

Image
# हसरे_दुःख  भा. द. खेर दिसते बरेच काही, ओढ तुझीच मना रे जाणून घ्यावे तुजला, दुःख होईल हासरे ____सकाळचे आठ वाजले आणि कुर्ला टर्मिनलहून, गुवाहाटी एक्सप्रेसने मी प्रवास चालू केला. आज गाडीतील मुसफिरांत, बाहेरच्या सृष्टी सौंदर्यात मला स्वारस्य नव्हतं. आज माझ्या हातात उशिराने का होईना, पण एक महान कलाकाराचा जीवनपट होता. गाडी आम्हाला घेऊन पुढे पळत असताना ती बरंच काही अगदी जवळून मागे सोडत होती. स्थित वृक्षवेली, आषाढात हिरवा शालू नेसलेली धरा मागे पळवत होती. तरी खिडकीतून दिसणाऱ्या त्या विहंगमय दृष्याकडे मी आज पाठ फिरवणार होतो. जाणे कधी काय वाढे, नियती माझ्या पुढ्यात तुम्हा हसरे पाहून, रमलो माझ्या दुःखात ____माझा पुढचा प्रवास गोरखा लँड स्ट्राईक ची झळ सोसत असलेल्या पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या खडतर वाटांवरून होणार असला तरी आज जगविख्यात विनोदसम्राट "चार्ली चॅप्लिन" यांचा जीवन प्रवास, भा. द. खेर यांनी शब्दबद्ध केलेल्या "हसरे दुःख" या कादंबरीतून मी जाणणार होतो. भा.द.खेर यांच्या भाषेत म्हणायचं तर, आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कल

रांजण ( नम्रता माळी पाटील ) ranjan

Image
# रांजण माणसाच्या चेहऱ्यावरून ज्याप्रमाणे आपण एकंदरीत त्याच्या अंतरंगाचा अंदाज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या अंतरंगाचा अंदाज त्याच्या मुखपूष्ठावरून आपण घेत असतो. हा आता ते त्या अंतरंगाला किती साजेसं आहे, हे ते पुस्तक वाचल्यावरच आपल्याला कळतं. पण "रांजण" या पुस्तकाचे मुखपृष्ठ हे पुस्तक वाचल्यानंतर त्याला अगदी साजेसं आहे असं मी म्हणीन. त्याच बरोबर पुस्तकाची बांधणीही सुंदर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःख असते. वरवर माणूस कितीही सुखी असला तरी त्याच्या आयुष्यात दुःखाचा एक कोपरा असतोच. आणि "रांजण" या कथासंग्रहात आपले मनोगत व्यक्त करताना सुखाबरोबरच लेखिकेने, दुःख म्हणजे काय तर "रांजण" सारख्या एखाद्या खोल भांड्याच्या तळाशी, अंधारात दडलेली भावना असावी. आणि ती हात घातला तरच जाणवेल. असं म्हटलं आहे. त्या जाणिवेला आपल्याला जाणीवपूर्वक टाळता आलं तर आपण त्या मानाने सुखी राहूच शकतो. अंधारास द्यावा नेहमी प्रकाश अंधाराशी अंधाराने लढू नये एक दिवा नेहमी असावा सोबत वाऱ्याशी उगा त्याला भिडवू नये या कथासंग्रहात ४८ कथा आहेत. लेखिकेने विविध विषयांवर प्रकाश