Posts

Showing posts from November, 2025

GAMMAT

  तर... गम्मत अशी झाली, आज मी अंधेरीला चाललो होतो. 9.05 च्या बोरिवली लोकलने मी जाणार होतो. मी तिकीट काढून पालघराला प्लॅटफॉर्म 2 वर थांबलो होतो. त्या आधीची वसई लोकल माझ्या समोर निघून गेली. मागून आवाज आला, "अरे नितेश भाऊ, कुठे चाललास..?" मी म्हंटल "अंधेरी. अन तू कुठे रे अभि Abhi ..." "अरे वसईला चाललो..." " आत्ताच गेली की वसई..! आणि असा वैतागलेला का दिसतोस..??" "हो ना रे, त्या म्हातारीने सकाळ सकाळ सटकवली यार..!" "का काय झालं..??" "चल आधी सँडविच खाऊ चल, तुला सांगतो." "ये मामा दोन टोस्टेड दे रे" "अरे काय झालं काय..." " अरे लगबगीने मी घरून आलो, गाडी पकडायची म्हणून... तसा उशीरच झालेला रे... त्यात सकाळची वेळ, तुला माहीत आहे ना किती रांग असते ती... "हो ना..." तोवर मामा हातात प्लेट घेऊन "येलो आपका सँडविच" त्या प्लेट घेतल्या आणि आम्ही खाऊ लागलो. मी म्हणालो "हा तर पुढे..." "हा... तर, नशीब मित्र भेटला, गाडीची वेळ झालेली... त्याला म्हंटल माझं एक वसई रिटर्न काढ... आणि मी...

नशा

  नशा नाही अशी माणसं सापडणे म्हणजे दिव्यच. नशा म्हणजे काय..!! सवयच की... त्यात चांगल्या सवयी आणि वाईट सवयी असे वर्गीकरण आपण करतच असतो. चांगल्या सवयी माणसाला तारतात, त्याचं आयुष्य समृद्ध बनवतात. तर वाईट बुडवतात. वाईट सवयींच्या अति आहारी गेल्यामुळे, सर्वस्व हिरावून माणसाचं आयुष्य रीतं होऊन जातं. आणि या स्तिथीतील बहुतांशी माणसं दारूच्या आहारी जातात. झिंग चढवुनी झाले द्रव्य पसार आहे खच रिकामी बाटल्यांचा बेसुमार आहे परवा माझा एका मित्र भेटला होता. आईबाबांचा एकुलता एक मुलगा. पैसा अडका काहीच कमी नाही. बाबानेही आपली होती नव्हती तेवढी जमीन विकून बक्कळ रुपये साठवलेले. त्यामुळे काय साहेबांची मज्जा. कामधंदा करायचा नाही. दारात दुचाकी, चारचाकी उभ्या. बुलेटवर सेल्फ मारून उनाडायचं काम जोरात... ब्रांडेड वस्तूंचा भारी नाद. मग कपडे असो, शूज, चप्पल, घड्याळ, इव्हन आंतरवस्त्र देखील. आणि आजकाल तर विदेशी दारूचीही लत जडलेली त्याला. ( आता देशीवर आलाय ) उचे लोग उची पसंद... अशी ख्याती. आता ते किती दिवस पुरणार ना..!! पाचशे रुपये मागत होता माझ्याकडे... मी पाहतच राहिलो त्याच्याकडे... मी दिले, पण त्याला म्हंटल. ...

मूलभूत_गरजा

  आग कितीही जोरात भडकली, वारा कितीही सुसाट सुटला, पाऊस कितीही जोराचा पडला, तरी प्रकृतीच्या नियमाप्रमाणे ते कुठेतरी येऊन थांबतं. पण ते अश्या परिस्तिथीत जितका वेळ या भूतलावर थांबतील, तितकी जास्त फरफट या पृथ्वीतलावर असणाऱ्या, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जीवांची होत असते. भूतकाळात याचे परिणाम जीवित जीवांवर, त्यांच्या पूर्वजांवर काय झाले. याचे मुडदे वर काढण्यापेक्षा, आज आम्हाला त्यापासून आमचा बचाव कसा करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. भूतकाळात झालेल्या संघर्षामुळे आताही तसाच संघर्ष उत्पन्न करावा, याहून दुसरे पातक नाही. रोज चुलीत अन्न शिजवण्यासाठी आगीची गरज पडते म्हणून कोणी आगीचा भडकलेला भडका घरात घेऊन येत नाही. घरातील गरम वातावरण थंड करण्यासाठी वारा लागतो म्हणून कुणी वादळ घरात घेऊन येत नाही. घरात रोजच्या व्यवहारात पाणी लागतं म्हणून जोराचा पाऊस चालू असतांना कुणी घराचं छप्पर काढून टाकत नाही. प्रत्येक जीवास त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षातून सुख या संकल्पनेला साध्य करण्यासाठी झटत असतांना नेमकं सुख कशात आहे याचा जीवांना विसर पडतो. आणि परिणामी माणूस द...

पुस्तकं

  #पुस्तकं वाचून वाचता, वाचवता आले तर वाचण्यात अर्थ आहे अन्यथा त्या पुस्तकांना लागलेली वाळवीच ठीक आहे ____थोर महापुरुषांची, वीरांची गाथा संपूर्ण जगात सर्वश्रुत असते. ती पुस्तकं, त्यातील संदर्भ, इतिहासातील दाखले, काही कागदपत्र, शिलालेख आणि बरच काही. आणि ते मिळवण्यासाठी धेय्यवेड्या साहित्यिकांनी जीवाचं रान करून आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून ती कमावलेली ऐवज असते. त्याचा काही मोबदला मिळवा म्हणून ते हे कार्य करीत नसतात. पुढच्या पिढीला इतिहासाची अनुभूती यावी, सुसंस्कार घडावेत, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं इतकीच काय ती मनीषा असावी. ____अस असताना एखादा असाही लेखक असु शकतो कि त्याचे विचार नेमके उलट प्रवाही असू शकतात. एखादा मजकूर पुस्तकात असा काही लिहून जातात कि वाचणाऱ्याच्या मनात द्विधा परिस्तिथी उत्पन्न होते. आणि मग विचारांच युद्ध चालू होतं. मनात आणि आपसूकच समाजातही. हा आता त्यात कोण जिंकतो हे वाचणाऱ्याच्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून असत. शेवटी काय आत्मसात करावं आणि काय नाही याचा सर्वस्वी हक्क आपलाच तर असतो …!!! पण काही जरी असल तरी विजय नेहमी सत्याचा, अचूक योग्य विधानांचा होत असतो. ____थोर महाप...